महाराष्ट्र मुंबई

पूरग्रस्त भागात शरद पवार स्वातंत्र्यदिन साजरा करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करतील. 14 आणि ऑगस्टच्या दौऱ्यासाठी पवार मंगळवारी रात्री कराडला दाखल होतील. बुधवारी सकाळी कराडहून हातकणंगले आणि शिरोळचा दौरा करतील. 15 ऑगस्टला शिरोळमध्ये ध्वजवंदनानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होतील. चिखली, आंबेवाडी, वडंगे, कसबा बावडा या गावांना भेटी देतील. नंतर कोल्हापुरात पत्रकार परिषदेला संबोधित करून पुण्याकडे निघतील.

राज्यातील सर्व पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे जून 2019 अखेरपर्यंतचे सर्व थकित कर्ज, व्याजासह सरसकट माफ करावे, नवीन पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून किमान ४ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत प्राप्त करुन घ्यावी. सर्व पंचनामे व नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करावा अशी मागणीही राष्ट्रवादीने केली.

पाण्याखाली असणाऱ्या पिकांना, ऊस आणि आंबा, काजूसारख्या सर्व फळपिकांना हेक्टरी 1 लाख रुपये, भाताला 50 हजार, नाचणीसाठी 40 हजार रुपये अनुदान द्या, शेतपिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करा, खरवडलेल्या जमिनींसाठी, शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर 25 हजारांची मदत जाहीर करा. शेतकरी आणि शेतमजुरांना 40 हजार रुपये रोख द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. 

पूरग्रस्त भागात 48 तासांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली असलेल्या मालमत्तांना नुकसानभरपाईची अट शिथिल केल्याची घोषणा सरकारने केली आहे. याचा शासन निर्णय तातडीने काढा, वाहून गेलेल्या पशूधनाची नुकसान भरपाई द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आहेत की फडणवीस???”

-टी-20 विश्वचषकात दिव्यांगांनी मिळवून दिलं भारताला विश्वविजेतेपद

-प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार!

-1998 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळले जाणार क्रिकेट; आयसीसीची घोषणा

-…म्हणून ग्रामीण भागात 10 हजार तर शहरात 15 हजार रुपयांची मदत करणार- मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

IMPIMP