पुणे महाराष्ट्र

राजीनामा देण्याअगोदर चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या….- शरद पवार

पुणे |  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्याअगोदर त्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटल्या. या भेटीत काय झालं? याचा खुलासा पवार यांनी काल पुण्यात केला.

चित्रा वाघ माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरलेल्या होत्या. आमच्या बचावासाठी मी पक्ष सोडून जात आहे, असं सांगितल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी भाजप दबाव टाकत आहेत, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर चित्रा वाघ चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सुद्धा टाकली होती. मात्र पतीवर ट्रॅप होताच त्या शांत झालेल्या पहायला मिळाल्या. 

आपले पती या प्रकरणातून सहीसलामत सुटावेत हे चित्रा वाघ यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांना भाजपची मदत लागेल. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जातंय.

दरम्यान, जे गेले त्यांना जाऊ द्या… तरूण कार्यकर्ते मोठ्या नेटाने आणि जोमाने काम करत आहेत. या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते मला माहिती आहे, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘हे’ पाच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीसोबतच; शरद पवारांचा दावा

-गद्दारीने परतफेड करण्याचा इतिहास आलाय- जितेंद्र आव्हाड

-राष्ट्रवादीचा हा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार!

-राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतो मी पवारांसोबतच राहणार; ‘कोणाच्याही संपर्कात नाही’

-यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका- शरद पवार

IMPIMP