भाजप प्रवेशाला नकार दिला म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड पडली- शरद पवार

पुणे |  राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ भाजपप्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सने धाड टाकली, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

जे लोकं भाजपमध्ये जात नाहीत त्यांच्या घरावर ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्याची भिती सत्ताधारी लोकं दाखवत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी सरकारवर केला. दोन दिवसांपूर्वी कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर इन्कम टॅक्सने धाड टाकली होती. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हसन मुश्रीम यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतू त्यांनी काहीही झालं तरी ‘पवार एके पवार’, असं म्हणत भाजप प्रवेशाचं आमंत्रण त्यांनी धुडकावून लावलं होतं.

मुश्रीफांनी भाजप प्रवेशाचं आमंत्रण धुडकावल्यामुळेच त्यांच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडली, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
दरम्यान, माझ्या घरावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. या झाडाझडतीत कपाटं विस्कटली, गाद्या फाटल्या. माझं कौटुंबिक जीवन अस्ताव्यस्त झालं आहे. माझ्या सुनांना देखील कधी आपल्या सासऱ्याच्या घरावर धाड पडेल असं वाटलं नव्हतं, असं राष्ट्रवादीचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका- शरद पवार

-आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड

-प्रकाश आंबेडकरच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!

-खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकरांचा मार्ग मोकळा??

-“सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगलं वाहन चालवतात”