महाराष्ट्र मुंबई

मनसेची ‘ही’ भूमिका आम्हाला मान्य नाही- शरद पवार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी याच प्रकरणी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याजवळ आपलं गाऱ्हाणं मांडलं. जर बॅलेटपेपरवर आगामी विधानसभा निवडणूक घेतली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मनसेने दिला आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

ईव्हीएमविरूद्ध मनसेची भूमिका आग्रही आहे. परंतू निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंबंधीची मनसेची भूमिका फारशी पटलेली नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर मी दिल्लीत अनेक लोकांशी बोललो आहे. अनेक पक्ष ईव्हीएमच्या विरूद्ध आहेत. ते सुद्धा आक्रमक आहेत. परंतू मनसेची बहिष्कारासंदर्भातील मागणी आम्हाला मान्य नाही, असं पवार म्हणाले आहेत.

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आम्हाला आयोगाकडून फारशी अपेक्षा नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची??, अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे आघाडीत सामिल होणार अशा चर्चा आहेत. मात्र राज ठाकरेंशी अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मनसे आघाडीत सामिल होणार? स्वतंत्र निवडणूक लढणार? की ईव्हीएमच्या मुद्द्यावर आक्रमक होत टोकाचं पाऊल उचलणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-

-रोहित-विराटच्या वादाला नवं वळण; विराट पत्रकार परिषद घेणार!

-उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

-“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

-काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

IMPIMP