पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळतीवर अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मौन सोडलं आहे. यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे.
1980 च्या विधानसभा निवडणकीमध्ये माझे 60 आमदार निवडून आले होते. मी काही कामानिमित्त परदेशात गेलो. त्यावेळी सत्तेची लाच आणि आमिष दाखवून काहींनी आमदार फोडले. मग माझ्याबरोबर फक्त 6 आमदार राहिले. त्यानंतर मात्र 1985 च्या निवडणुकीमध्ये मी 6 चे 60 आमदार निवडून आणले आहेत हे विसरू नका, असं शरद पवार म्हणाले.
पक्षातील आमदार सोडून गेेले तरी पक्षाला काहीही फरक पडणार नाही. याउलट तरूण कार्यकर्त्यांना अधिकाअधिक संधी देता येईल, असंही पवार यांनी सांगितलं.
जरी काही लोकं बाहेर पडत असले तरी तरूण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहाने पक्षाचं काम करत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत तरूणांना अधिक संधी देता येईल, असं पवार म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून पवारांच्या जवळच्या माणसांनी पक्षाला रामराम ठोकला. यावर बोलताना जे गेले ते माझ्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलून गेले पण पक्षाला आणि मला कोणताही फरक पडणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड
-प्रकाश आंबेडकरच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!
-खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकरांचा मार्ग मोकळा??
-“सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगलं वाहन चालवतात”
-…अखेेर NDRF च्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्र्यांनी केलं तोंडभरुन कौतुक