सातारा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पडझडीवर आणि जे नेते सोडून जात आहेत त्यांच्यावर मिश्किल पद्धताने भाष्य करत संबंधित नेत्यांना टोला लगावला.
शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल, असं पवार म्हणाले. ते आज साताऱ्यात बोलत होते. 2-3 नेते पक्ष सोडून गेले किंवा 2-3 नेते इतर पक्षात दाखल झाले तर मेगा-भरती होत नाही, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताना सचिन अहिर, चित्रा वाघ, वैभव पिचड, नाईक यांनी आमच्या हृदयात पवार साहेब आहेत आणि इथून पुढच्या काळात देखील असतील, असं म्हटलं होतं. त्यावरच पवारांनी मिश्किल कोटी करत त्यांना टोला लगावला.
शिवेंद्रराजे भाजपात गेल्याने आम्हाला कोणताही फरक पडणार नाही. साताऱ्याची जागा आम्ही गमावणार नाही तर जास्त फरकाने जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हाताच्या बोटावर मोजण्याइकते लोकं भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे याला मेगाभरती म्हणू शकत नाही. मला अशा घटनांचा अभुभव आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, अजून कोणी पक्ष सोडून जाणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!
-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!
-शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी युवक’वर सोपवली ही मोठी जबाबदारी!
-नगरची जागा न सोडणं अंगलट; राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात विखेंचा मोठा वाटा
-होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे