“भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं 10 गोष्टी केल्या तर चीन 1 हजार गोष्टी करेल, राफेल ‘गेमचेंजर’ ठरणार नाही”

मुंबई |  बहुचर्चित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र राफेल गेमचेंझर ठरणार नाही आणि राफेल आपल्या ताफ्यात सामील झाल्याने चीनला चिंता वाढणार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सीएनएन न्यूज 18 दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं 10 गोष्टी केल्या तर चीन 1 हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपण चीनसोबत असलेल्या गंभीर तणावाने विचार करत आहोत. मात्र आपल्या हवाई दलात राफेल आल्याने चीनला काही चिंता वाटणार नाही. कारण ते आपल्या पुढच्या टप्प्यात असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या भूमिपूजनाला गेले तर काहीही हरकत नाही. त्यांनी जरुर जावं, मात्र महाराष्ट्रातला प्रश्न महत्त्वाचा आहे असं त्यांना वाटलं आणि ते गेले नाहीत तरीही आमचं काहीही म्हणणं नसल्याचंही पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्याा-

…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरे गरजले

दिलासादायक! पुण्यात जम्बो रुग्णालयं उभारण्याबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

चंपा, टरबुज्या म्हटलं तर…; भाजप नेत्यांना ठेवण्यात आलेल्या टोपण नावाने चंद्रकांत पाटील भडकले!

भाजपचा पडद्याआड महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न सुरू आहे- शरद पवार

जसं शरद पवारांचं वय वाढतंय तसा त्यांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढताना दिसतोय- निलेश राणे