‘अशी वेळ कधीच आली नव्हती, मी यापूर्वी अनेकदा…’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी लालपरी अर्थात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची एसटी सध्या रस्त्यावर धावताना दिसत नाही. संपाच्या गर्तेत अडकलेल्या एसटीचा संप सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

गेल्या तीन महिने झालं एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. परिणामी राज्यातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संप मागं घेण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारची कारवाई आणि चर्चा करण्यात आली पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

अशात शरद पवार यांनी संपकरी कर्मचारी आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली आहे. शरद पवार यांनी अनेक अंगानी चर्चा केली आहे.

अशी वेळ आधी कधीही आली नव्हती. मी यापूर्वी अनेकदा एसटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उपस्थित होतो. त्यावेळी एसटी कामगारांचा दृष्टिकोन एसटी आणि प्रवाशांबाबत विधायकच असतो हे मी जाणतो.

एसटी संपाबाबत कृती समितीबरोबर आज विस्ताराने चर्चा केली. माझ्या दृष्टीने प्रवासी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याबद्दलचे वर्णन न केलेलं बरं, असं पवार म्हणाले आहेत.

सध्या अशी परिस्थिती असताना त्यातच कोरोनाचा नवा अवतार आल्यामुळं महाराष्ट्रावर आणखी एक संकट कोसळलं आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होत आहे, असं पवार म्हणाले आहेत.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सरकार कर्मचाऱ्यांना जितकं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी आता कर्मचाऱ्यांनी देखील प्रवाशांचा विचार करावा, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

कृती समितीने सरकारच्या निर्णयात ज्या काही त्रुटी दाखवून दिल्या, त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली आहे. पण त्याआधी एसटी सुरू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर आले पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या खूप दिवसांपासून चालू असणारा हा संप आता शरद पवार यांच्या मध्यस्तीनंतर संपणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा ट्विट –

महत्वाच्या बातम्या-

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर

पोस्टाची भन्नाट योजना; दरमहिन्याला पैसे कमवण्याची संधी