चंद्रकांत पाटलांच्या नव्या दाव्याने चर्चांना उधाण, म्हणाले…

कोल्हापूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस अधिकारी बदली प्रकरणाबाबत विधानसभेत जो पेनड्राईव्ह सादर केलाय त्यावरुन त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात सीबीआय (CBI) चौकशी झाल्यानंतर सीबीआयचा जो रिपोर्ट समोर आल्यानंतर कोण-कोण आतमध्ये (जेलमध्ये) जाणार हे सांगता येणार नाही, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

हे गोंधळून गेले आहेत. घाबरुन गेले आहेत. त्यांचे एका मागेमाग एक मंत्री जेलमध्ये जात असल्याने विरोधी पक्षाचंही कोणतीरी आतमध्ये जायला पाहिले त्यासाठी भाजप नेते गिरीश महाजनांवर केस तयार केली गेली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारचं जे रिमोट कंट्रोल करत आहेत, त्यांना 50 वर्षांच्या राजकारणामुळे खूप गोष्टी कळतात. हे सगळे भांबावून गेले आहेत. मग त्यांनी एक इंजेक्शन दिलं की यांना धावावंच लागतं. तसं आता इंजेक्शन मिळालं असेल, अरे आता करताय का? आपले सगळे लोकं कसे फटाफट आतमध्ये चालले आहेत. हे इंजेक्शन दिल्यामुळे ते उठून काहीतरी चुकीचं करायला लागले आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

बदल्यांमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचा डाटा तुम्हाला कसा मिळाला असं हे प्रकरण आहे. आता याप्रकरणात सीबीआय चौकशी झाली आणि सीबीआय चौकशीत काय रिपोर्ट बाहेर येणार आहे, कोणकोण आतमध्ये जाणार हे सांगता येणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

या सरकारचा चोराला सोडून सावाला पकडण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न गेले दोन-अडीच वर्षांपासून सुरु आहे. पण बुडत्याचा पाय खोलात, विनाशकाली विपरीत बुद्धी, तसं त्यांनी बदल्यांमधील अनियमितेबाबत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केली. याबाबत त्याची चौकशी लावून, संबंधित माहिती मिळाली कशी अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली, असंही पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली” 

“राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का?” 

राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले “संजय राऊतांनी….” 

“परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो”

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रूपये गुंतवून मिळवा तब्बल 14 लाख