“राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात आणि मग एखादं लेक्चर देतात”

कोल्हापूर | सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासावा, असं प्रत्त्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

सर्व जातीचा लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची भूमिका राष्ट्रवादीची आजही आणि उद्याही राहिल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे, असंही पवार म्हणाले.

शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना, राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला शरद पवार यांनी आज उत्तर दिलं.

देशासमोर मुख्य प्रश्न दोन चार आहेत. एक महागाईचा आहे. पेट्रोल डिझेलचा प्रश्न आहे. यापूर्वी किंमती वाढल्या नाही असं म्हणत नाही. पण रोज किंमती वाढतात हे कधी पाहायला मिळालं नाही. आज पेट्रोल डिझेलचे दर रोज वाढत आहेत. मला एकट्याला त्रास होतो असं नाही. भाजीपाला, अन्नधान्याचा खर्च वाढतो. प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो. त्याची किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते, असं पवारांनी म्हटलंय.

सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही. मला आठवतं मी एकेकाळी मी केंद्राच्या सरकारमध्ये होतो. कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. माझा दृष्टीकोण वेगळा होता. शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर मी त्याला विरोध करत नाही, असं मी स्पष्ट केलं होतं. लोकसभेतील माझं हे विधान ऐकल्यानंतर भाजपवाले दुसऱ्या दिवशी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले आणि त्या ठिकाणी आम्हाला महागाईवर तडजोड करायची नाही असं त्यांनी सांगितलं. ती भूमिका आज सत्तेवर आल्यावर का बदलली? आज त्या सर्व प्रश्नाकडे ते अजिबात बघायला तयार नाहीत, असं ते म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि अन्य निवडणुकांमध्ये राज ठाकरेंचा पक्ष किती प्रभावी आहे हे मी सांगू शकत नाही. मागच्या निवडणुकीचे आकडे सर्वांना माहीत आहे. त्यांचे आकडे अत्यंत मर्यादित आहे. त्यांचा आकडा मोजायचाच असेल तर हाताच्या बोटापलिकडे जात नाही. अशा प्रकारचा लोकांचा त्यांना मिळालेला पाठिंबा दर्शवितो. त्यानंतर ते काही कर्तृत्व दाखवतील हे सांगू शकत नाही, असा चिमटाही पवार यांनी काढला.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका; मसाल्यांसह ‘या’ वस्तू महागल्या 

UPA च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘…तर मी राजकारण सोडेन’; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज 

“शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही”