“राज ठाकरेंच्या सभांमुळे करमणूक होते, त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

पुणे | ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून केली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंच्या सभांमुळे करमणूक होते, अशी टीका शरद पवारांनी राज ठाकरेंवर केलीये.

राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण त्या सभेत शिवराळ भाषा, नकला असतात. त्यातून करमणूक होते. त्यामुळे लोक जातात. त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की मी नास्तिक आहे. मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही, असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय.

राज ठाकरेंनी काहीतरी बालिश पद्धतीने भाषणात उल्लेख केला. त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? अजित पवार-सुप्रिया सुळेंबद्दलचा आरोप राजकीय नसून पोरकट आरोप आहे. मी आणि अजित पवार काय वेगळे आहोत का?, असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरेंच्या पूर्ण भाषणात भाजपबद्दल काही वाक्य होती, पण त्यांच्यावर भाजपनं कदाचित काही जबाबदारी दिली असावी. ती निभावण्याची संधी त्यांनी साधली असावी. भाजपबद्दल राज ठाकरे एक शब्द देखील बोलत नाहीत. याचा अर्थ काय?, असं शरद पवार म्हणाले.

माझ्यापुढे काही आदर्श आहेत. त्या आदर्शांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. त्यांचं लिखाण वाचलं, तर याबाबत सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रचंड टीका केली आहे. त्याचा गैरफायदा घेणारा कुणी घटक असेल, तर त्याला ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं लिखाण आम्ही लोक वाचतो, पण सगळेच वाचत असतील, कुटुंबातले लोक वाचत असतील असं नसावं. त्यामुळे अशी वक्तव्य केली गेली असावीत. यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार म्हणालेत.

वर्ष-सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून आपलं मत व्यक्त करत असतात. पण ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नसते. पण तुम्ही प्रश्न विचारला, म्हणून मला त्यात काहीतरी सांगावं लागेल, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं’; शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला 

सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल 

‘काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे’; पंकजा मुंडेंचा भावाला प्रेमाचा सल्ला 

राज्यातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

…अन् मॅच सुरू असताना टॉपलेस होऊन मैदानात घुसली महिला, पाहा व्हिडीओ