“तुझ्या हृदयात जर पवार साहेब आहेत, मग गेला कशाला?”

हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवेसना, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांचा शरद पवारांनी  जोरदार समाचार घेतला आहे. तुझ्या हृदयात जर पवार साहेब आहेत तर मग गेला कशाला? असं म्हणत पवारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सभेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्याला मोठी लढाई करायची आहे, हा संदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

अनेक लोक आम्हाला सोडून विरोधी विचारांच्या पक्षात जात आहेत. मला अशा लोकांची काहीच चिंता नाही. ते जाताना सांगतात की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला?, असं पवार म्हणाले आहेत.

हे लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. मात्र मी तसा नाही. ज्या खेड्यापाड्यातील लोकांनी आम्हाला मदत केली, शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसांसाठी झटणार, हा निर्धार कायम आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्यांना पक्षानं मोठं केलं तेच नेते पक्ष सोडून गेले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-