संजय राऊतांच्या अटकेवर बोलण्यास शरद पवारांचा नकार

मुंबई | शिवसेनेची धडाडती तोफ आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) काल रविवार (दि. 31 जुलै) रोजी तब्बल 18 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनतंर अटक केली.

त्यांच्यावर पत्राचाळीच्या पुनर्विकास घोटाळ्याचे आणि पैशांची अफरातफर केल्याचे आरोप आहेत. पत्राचाळ पुनर्विकासाच्या आर्थिक अफरातफरीप्रकरणी चौकशीअंती संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आले.

अगोदर काही दिवस त्यांना संचलनालयाने अनेक समन्स पाठवले होते. त्यांनी वैध कारणे सांगून चौकशीला दांडी मारली होती. त्यामुळे रविवारी ईडीने त्यांच्या रहात्या घरी अगोदर चौकशी केली आणि नंतर त्यांना पुढील कारवाईसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले.

रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास त्यांना ईडीने अटक केल्याचे जाहीर केले गेले. त्यावरुन आता राज्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया देत हा शिवसेना संपवण्याचा आणि प्रश्न विचारणाऱ्यांची तोंडे बंद करण्याचा प्रकार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना यावर प्रतिक्रिया विचारल्या असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला, तसेच त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संजय राऊत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. जर राऊतांनी काही केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि जर त्यांनी काही केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे म्हंटले होते.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर ते आता राज्याच्या राजकारणाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या या अटकेवर शिवसेनेकडून राज्यभरात निदर्शने आणि आंदोलने केली जात आहेत.

महत्वाच्या बातम्या –

संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

‘हे काही शहाणपणाचं नाही’, राज्यपालांविरोधात शरद पवार आक्रमक

राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…

‘दरवेळी उपलब्ध असलेले फडणवीस आता कुठे गेले?’, सुप्रिया सुळेंची टोलेबाजी