Sharad Pawar: शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण मागील दोन आठवड्यापासून चांगलंच पेटल्याचं पहायला मिळालं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या चित्रपटावर आपलं मत व्यक्त केलं होतं.

त्यानंतर देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केल्याचं दिसून आलं. टीव्हीवरील अनेक कार्यक्रमात हाच मुद्दा चर्चेत होता. त्यावर कश्मीरमध्ये देखील चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हाच मुद्द्यावरून खडाजंगी पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या चित्रपटावरून भाजपला लक्ष केलं होतं.

काश्मीर फाइल्स चित्रपटाचा आधार घेत भाजप चुकीचा प्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता.

शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करतंय. मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचं पुनर्वसन केलं असतं, असंही पवार म्हणाले होते.

मोदी सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करतंय, असा आरोप देखील शरद पवारांनी यावेळी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्यामध्ये अल्संख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागलीय त्यामुळे आता अशी वक्तव्य समोर येत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, मला असं वाटतं की, जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पूर्वीपासून चालत आलाय. अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी एक्सपर्स्टने बदल केलेत, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुख्यमंत्री ठाकरे गृहखात्यावर नाराज?, दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं…

Video | गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडचा भररस्त्यात राडा; डिलिव्हरी बॉय सोडवायला गेला अन् भलतंच घडलं…

“गृहखात्यानं कठोर पावलं उचलावी अन्यथा…” 

फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका, स्वत:चा विकासही त्यातून करा- नरेंद्र मोदी 

“अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत”