नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालेत. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही राजकीय स्थिती ही कायम नसते, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
1977 मध्ये सर्वच राज्यात काँग्रेस आली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात असा सगळ्याच राज्यांत काँग्रेस हरली होती. त्यावेळी काँग्रेस संपली असं म्हटलं गेलं. मात्र काँग्रेस पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.
राजकीय पक्ष हे एका क्षणात संपत नसतात. पण काँग्रेसच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी आपण कुठे कमी पडलो, कुठे एकत्र येण्याची गरज होती आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे होते, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसला दिला आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि केंद्र सरकारविषयी असलेल्या रागामुळे जनतेने आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला. तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांची चूक झाली असं वाटत नाही. अखिलेश यादव यांना मिळालेल्या जागा दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
विरोधी पक्ष म्हणून आपण जनमताचा आदर केला पाहिजे. ईव्हीएम संदर्भात अनेकांच्या तक्रारी आहेत. पण मला याविषयी काही बोलायचं नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पाच राज्यांतील लोकांनी भाजपच्या फेवरमध्ये मतदान केलं, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सांगताना शरद पवार यांनी आता राष्ट्रीय स्तरावर रणनिती आखावी लागणार असं सूतोवाच केलं
महत्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं!
काँग्रेसला जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं!
भाजपचा राऊतांना चिमटा, म्हणाले “संजय राऊत हाउज द जोश!”
‘म्याऊ म्याऊ’ म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं; ट्विट करत म्हणाले…
Goa Election Result 2022 | मुख्यमंत्री प्रमोद सावंत हरता-हरता जिंकले