सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची संगत का नको? जाणून घ्या कारणे

पुणे | महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचा वाकड (पिंपरी चिंचवड) येथे वार्षिक मेळावा पार पडला. यावेळी निमंत्रण पत्रिकेत सत्ताधाऱ्यांची आणि मान्यवरांची नावे असूनसुद्धा त्यांनी गैरहजेरी लावली.

उत्पादक संघाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आदी नेते आणि मंत्र्यांची नावे होती.

ऐेनवेळी यांनी कार्यक्रमाला दाडी मारल्याने उपस्थित शेतकऱ्यामंध्ये खसखस पिकली. राज्य सरकार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला.

सदर मेळाव्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) होते. गेली अनेक वर्षे शरद पवारच या मेळाव्याचे अध्यक्ष असतात. पण यावेळी सत्ताधारी वर्गातील लोकांनी दांडी मारल्याने विविध चर्चांना उधान आले आहे.

शरद पवार हे महाविकास आघाडीचे (MVA) प्रणेते आहेत. सध्याचा काळ हा शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादाचा आणि याचिकांचा काळ आहे. त्यामुळेच तर सत्ताधारी शरद पवारांना टाळत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रविवारी (दि. 28) पुण्यात होते. यावेळी त्यांनी चांदणी चौकाला (Chandani Chowk) भेट दिली, त्यांनी पिंपरी चिंचवडच्या मेळाव्याला जाण्याचे टाळले.

राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या मेळाव्याला कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तसेच सत्ताधाऱ्यांनी आपल्या राजकारणासाठी या मेळाव्याकडे पाठ फिरवली, असा देखील सूर उपस्थित शेतकऱ्यांनी लावला.

महत्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; अमोल मिटकरी यांचे खळबळजनक भाकीत

गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी दिले नवे आदेश

“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे!” – मनसेचे संदीप देशपांडे

वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?

देवेंद्र फडणवीसांच्या “विनाशकाले विपरीत बुद्धिला” आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…