“शरद पवार नास्तिक आहेत म्हटलं तर त्यांना झोंबल आणि….”

औरंगाबाद | आज औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जोरदार राज गर्जना पहायला मिळाली.

आजच्या ऐतिहासिक सभेत राज ठाकरे यांनी आघाडी सरकार आणि विशेषतः शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलेला पहायला मिळाला.

राज ठाकरे यांनी शरद पवारांना अनेक मुद्द्यांनी घेरलेलं पहायला मिळालं. शरद पवार नास्तिक आहेत म्हटलं तर त्यांना झोंबल आणि तुमची कन्या लोकसभेत म्हटलीये माझे वडील नास्तिक आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी भर सभेत शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार म्हणतात, मी दुही माजवतोय. पवार साहेब तुम्ही जाती जाती भेद केला ना त्याने दुही माजलीये, असं राज ठाकरे म्हणाले.

भोंग्याच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले गेले पाहिजेत पण यांच्या मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर.

तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला विष कालवायचं नाही. पण 4 मे पासून आम्ही ऐकणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती मैदान पूर्णपणे भरलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष सुरु झाला” 

  “कोणी गोंधळ करायला आलं असेल तर तिथंच हाणा”; राज ठाकरे भर सभेत भडकले

  “मशिदींवरील भोंगे काढायला सांगितलं तर यांची हातभर फाटली आणि सांगतात….”

  “काही लोकांना वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे”

  “भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज करेल”