मुंबई |देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलं आहे.
मागील तीन वर्ष सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत आहेत.यंदा कोरोनाच्या संकटामुळे साखर उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीतून कारखान्यांना बाहेर काढावं अशी मागणी शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
साखरेची किमान विक्री किंमत सध्या 3100 रुपये आहे त्यात वाढ करून 3450 ते 3750 पर्यंत ग्रेड प्रमाणे वाढवून द्यावी तसंच मागील दोन वर्षात जेवढ्या ऊसाचं गाळप झालंय, त्या ऊसाला 1 टन ऊसामागे 650 रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे मोदींकडे केली आहे.
केंद्र सरकारकडून दिलं जाणारं निर्यात प्रोत्साहन अनुदान मागील दोन वर्षांचं केंद्राकडे प्रलंबित आहे, ते तात्काळ देण्यात यावं, असंही पवारांनी पत्रात लिहिलं आहे. साखरेचा साठा करण्यासाठी देण्यात येणारा दोन वर्षांचा खर्च केंद्राकडून मिळाला नाही, ते देण्यात यावे आणि साखर कारखान्यांवरील कर्जाचे 10 वर्षांकरता पुनर्गठन करावं, अशी मागणी पवारांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा- संजय राऊत
-“नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”
-…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
-कोरोनानं बदलला वकिलांचा ड्रेस कोड; पाहा आता काय झालाय बदल…