महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी केंद्र सरकारला बांधकाम व्यवसायिकांना मदत करण्याची विनंती केली आहे.

शरद पवार यांनी मोदींना लॉकडाऊनदरम्यान चौथ्यांदा पत्र पाठवलं आहे. शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना व्याजावर सूट देण्यात यावी किंवा आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी पत्रामार्फत केली आहे.

बांधकाम क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी स्वत: लक्ष देवून लवकर उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-एक जूननंतर लॉकडाउन हटवणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

-तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी

-पृथ्वीराज चव्हाण यांचं हे आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारतील का?

-…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

-‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम