मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात ट्विटर वाॅर पहायला मिळालं आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत टीका केली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचा सभेतील व्हिडीओ ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आज देशाची सुत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येेथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी चुकीचा शब्द वापरल्याचं पवार म्हणाले होते.
मला आश्चर्य वाटतंय, त्यावेळी कुठेही आदिवासी शब्द वापरण्यात आला नाही. त्याऐवजी वनवासी हा शब्द वापरला. वनवासी हा शब्द आदीवासींना मंजूर नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
याच शब्दांच्या वादावरून आता राजकारणाला तोंड फुटल्याचं दिसून येतंय.या प्रकरणावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची टीका खोडून काढली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर करत केला आहे. तुम्ही दावा केल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी शब्द वापरले नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
तुमच्या सारख्या मोठ्या नेत्यांना तथ्ये आणि नेमकी माहिती असायला हवी, असं म्हणतं देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांवर हल्लाबोल देखील केला आहे.
नरेंद्र मोदींनी आदिवासींच्या कार्यक्रमात बोलताना आरोग्य, शिक्षण ईत्यादी विषयांवर भर दिला आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये जनजातीय समाजाचे योगदान अतुट राहिलेल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 10 टक्के असूनही अनेक दशकांपासून जनजाती समाजाला त्यांची संस्कृती, त्यांचे सामर्थ, पुर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. आदिवासींचे दु:ख त्यांची तखलीब, लहान मुलांच शिक्षण, आदीवासींचे आरोग्य याबद्दल या लोकांना काही फरक पडला नाही, असं मोदी म्हणाले आहेत.
तुम्हीचं सांगा? जनजातीय समाजाच्या योगदानाशिवाय काय प्रभु राम चंद्रांच्या जीवनात सफलतेची कल्पना केली जाऊ शकते का, बिलकूल नाही, असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं होतं.
पाहा व्हिडीओ-
श्री शरद पवार जी, @PawarSpeaks
आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी @narendramodi यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत.
(1/2) https://t.co/VhLPbCyFc2 pic.twitter.com/PQXfaTl1ia— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ
“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा