“तुम्ही महाराष्ट्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तर मी ही तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत!”

औरंगाबाद |  गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पक्षाची साथ सोडून सत्ताधारी भाजपचं कमळं हाती घेत आहे तर कुणी शिवसेना पक्षप्रमुखांच्या हातून शिवबंधन बांधून घेत आहेत. पक्षाला गेल्या 2 महिन्यांपासून जबर धक्के बसले आहेत. पण 80 वर्षीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खचले नाहीत. हरले नाहीत. गेलेत त्यांची चर्चा करू नका आता येणाऱ्यांची चर्चा करा. आपल्याला तरूणांच्या हातात उद्याचा महाराष्ट्र द्यायचाय, म्हणत महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेत.

शुक्रवारी शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एक पीएचडीचा दादाराव जगन्नाथ कांबळे नामक विद्यार्थी शरद पवार यांना भेटला अन् 100 रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर त्याने तुम्ही महाराष्ट्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे तर मी ही तुमच्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत असेल. कधीही पक्ष सोडणार नाही, असं लिहून दिलं आहे.

स्टॅम्पपेपरवरचा आशय वाचून शरद पवार भावूक झाले. त्यांनी मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवला. त्यालाही मग काही काळ आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.

मी विद्यापीठातला एक संशोधक आणि आपला कार्यकर्ता आहे. साहेब आपल्या विचारांनी मी भारावून गेलो आहे. चहाच्या टपरीपासून ते खानावळीच्या खोलीत देखील मी आपला विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचवतो, असं त्याने स्टॅम्पपेपरमध्ये लिहिलं आहे.

पवार साहेब कुणी कुठेही गेले तरी मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष सोडणार नाही, असा विश्वास त्याने पत्राच्या माध्यमातून पक्षाला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-