“माझ्या नावावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते”

पुणे |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.  माझंही नाव ईडीने घेतल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते, असं मोठा खुलासा खु्द्द शरद पवार यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार यांनी ही सगळी माहिती कुटुंबात बोलून दाखवलं. चौकशीची कोणतीही भीती नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं, असंही शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यापासून मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय मात्र माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांनी त्यांच्या मुलासोबत बोलताना राजकारणाच्या घसरलेल्या पातळीचा उल्लेख केला. यापेक्षा शेती केलेली बरी असं ते त्यांच्या मुलाला म्हणाले, असं शरद पवार यांनी  सांगितलं.

दरम्यान, पुण्यातील पूरस्थितीमुळे कालपासून मनात अस्वस्थता होती. परिस्थिती गंभीर झालेली आहे, म्हणून मुंबई सोडली आणि पूरग्रस्त भागात भेट दिली, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-