राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिली होती म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांनी दिलं उत्तर

सातारा |  राष्ट्रवादीने भाजपला सत्तास्थापनेची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे. फडणवीसांच्या दाव्यानंतर शद पवार यावर काय बोलणार याकडे माध्यमांचं लक्ष लागलं होतं. अखेर पवारांनी त्यावर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार आज सातारच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं.

चार दिवसांपूर्वी द इनसायडरशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नव्हे तर थेट राष्ट्रवादी… त्याबाबत चर्चाही झाल्या होत्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शहांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला होता, असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.

फडणवीसांच्या या सगळ्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीतलं कुणीही काही बोललं नव्हतं. त्यामुळे पवार आता काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र पवारांनी या विषयाला जास्त महत्व न देता फडणवीस प्रसिद्धी मिळवणायसाठी अशी वक्तव्य करत असल्याचं म्हणत त्यांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट; साताऱ्यात चर्चांना उधाण!

-वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात….; उर्जामंत्र्याचे स्पष्ट निर्देश

-ठाणे जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ… मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

-पुणे जिल्ह्यासाठी राजेश टोपे यांचा ‘हा’ कठोर निर्णय! मुंबई शहरातही ‘नवा’ आदेश

-काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!