मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात महाजनादेश यात्रा घेऊन फिरत आहेत. यात्रेदरम्यान ते सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकीच भाषण फक्त शरद पवारांवर करतात. कारण त्यांना स्वप्नातही मीच दिसतो. त्यामुळे ते सातत्याने शरद पवार-शरद पवार घोकत असतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्यानिमित्त राज्यभर फिरून जनतेचा आशिर्वाद घेत आहेत. या यात्रेदरम्यान ते विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. विशेषत: शरद पवारांना टार्गेट करत आहेत. त्यावर आता पवार स्वत: बोलते झाले आहेत.
विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार राज्याचा दौरा करत आहेत. राज्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ते सध्या मराठवाड्यात आहेत.या दौऱ्यादरम्यान ते सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे.
मी अजून म्हातारा झालेलो नाही, अनेकांना घरी पाठवायचे आहे. जे गेलेत त्यांची नावे काढू नका. जो मावळणार आहे त्याची चर्चा कशाला करायची? इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्याच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली. लाचारी स्वीकारणाऱ्या या नेत्यांना लोक जागा दाखवतील, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
दरम्यान, खुद्द शरद पवार निवडणूकीआधी मैदानात उतरल्याने विधानसभा निवडणुकीत नक्की काय होणार? निकाल कुणाच्या बाजूने लागणार? हे पहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय; कोहलीचे नाबाद अर्धशतक – https://t.co/pCttiyLsnu @BCCI @ICC @imVkohli
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
मियाँ ओवैसी, जलील निजामाची पिलावळ… फूत्कार सोडत आहे- उद्धव ठाकरे https://t.co/jagaoekv15 @uddhavthackeray @OfficeofUT @imtiaz_jaleel @asadowaisi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
…तर त्यांचा ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरेंची जलीलांवर जहरी टीका https://t.co/9NhfbTTS8K @uddhavthackeray @imtiaz_jaleel #SamanaEditorial
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019