2024 साठी भाजपेत्तर पक्षांच्या युतीवर शरद पवार म्हणाले; काँग्रेसला सोबत घेऊ नये…

मुंबई | देशात सध्या राजकीय अशांतता आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात भाजप एकामागून एक राज्यात सत्ता स्थापन करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस देशभरात भाजपविरोधात प्रचार करत आहे.

काँग्रेसने खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली कन्याकुमारी ते काश्मीर (Kanyakumari to Kashmir) अशी तब्बल 3570 किमी पदयात्रा सुरु केली आहे. यात ते भारत जोडोचा (Bharat Jodo) नारा देत आहेत.

2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आले त्यावेळेपासून काँग्रेस आणि इतर लहान मोठ्या पक्षांना गळती लागली आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष भाजपच्या विरोधात एकवटताना दिसत आहेत.

सर्वांना 2024 साली केंद्रातून भाजपला हुसकून लावण्याची घाई झाली आहे. त्याचमुळे आता 2024 साली देशातील सर्व भाजपेत्तर विरोधी पक्ष एखादी संयुक्त आघाडी उभारणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) विरोधकांची एकजूट बांधण्याची तयारी करत आहेत. विरोधी पक्षांमध्ये चर्चा घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नेहमी पुढाकार घेत आले आहेत. त्यांनी यावर आता भाष्य केले आहे.

यावेळी त्यांनी आपण प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे देखील सांगितले. त्यांनी चर्चा केली पण त्याचे अद्याप निर्णयात रुपांतर झाले नसल्याचे पवार म्हणाले.

त्याचबरोबर काँग्रेसला सोबत घेऊ नये, असे काहींचे म्हणणे आहे. पण यावेळी कोणीही कोणाला सोबत घेऊ नये, अशा प्रकारची भूमिका मांडणे योग्य नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –

फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

दसरा मेळाव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मोठे वक्तव्य

मोठी बातमी; अभिनेता केआरके संघात प्रवेश करणार!

“काही आमदार हात पाय तोडण्याची भाषा करतात, अरे काय तुझ्या बापाच्या”

गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आत्ताच व्हा सावध!