महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते; पवारांची तोफ धडाडली

नवी मुंबई |  उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंवर त्यांनी तोफ डागली आहे.

मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून शिवाजी महाराजांनी नवं रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपला इरादा बोलून दाखवला. ते नवी मुंबईत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्ली शहराच्या भेटीसाठी ते गेले. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असं सांगत त्यांनी आगामी विधानसभेची रणनिती जाहीर करून उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जान भरली.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.

दरम्यान, विरोधकांवर टीका करताना शरद पवार चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री पाच वर्षांमध्ये आपण काय केलं हे न सांगता केवळ विरोधकांची निंदा-नालस्ती करण्यातच धन्यता मानत आहेत, अशी हल्ला त्यांनी विरोधकांवर चढवला.

महत्वाच्या बातम्या-