“आमच्या कुटुंबामध्ये कुठलाही वाद नाही; आम्ही सगळे एकीने राहतो”

पुणे |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठलाही वाद नाही, आम्ही सगळे एकीने राहतो, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पवार कुटुंबियांच्यात गृहकलह असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे, अशी चर्चा समाजमाध्यमांवर होत आहे. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

पवारांमध्ये कुटुंबप्रमुखाचा निर्णय अंतिम असतो. यापुढेही कुटुंबप्रमुखाचा निर्णय अंतिम राहिल, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी राजीनामा देण्याबाबत चर्चा केली नव्हती, त्याची काहीही माहिती मला नव्हती, कुटुंब प्रमुख म्हणून ते जाणून घेणं माझी जबाबदारी होती म्हणून मी संपर्क साधला, याची माहिती त्यांनी कुटुंबाला दिली, असंही पवार म्हणाले.

माझं नाव ईडीच्या चौकशीत आल्याने उद्विग्नता आहे हे मला स्पष्ट दिसतंय. पण माझी अजितशी भेट होईल तेव्हा मी कुटुंब प्रमुख म्हणून चर्चा करेन, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-