“भाजपचा एक आमदार फुटला, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना शरद पवारांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळालेल्या अतिरिक्त मतांपैकी एक मत हे शिवसेनेला ट्रान्स्फर होऊच शकलं नसतं. कारण विरोधकांच्या गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल्ल पटेल यांना मत दिलं होतं, असं शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केलं आहे. मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी या सगळ्यात पडलो नाही. तरीही विरोधी गटातील एका आमदाराने स्वत:हून राष्ट्रवादीला मतदान केले. हा आमदार भाजपचा नसून अपक्ष आहे. पण तो भाजपच्या गटातील आहे, असं पवारांनी सांगितलं.

अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत, ती अपक्षांची आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे. तर महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

चक्क शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले… 

Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election Result | अखेर निकाल लागला; संजय राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी 

“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”

Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट