…ती याचिका अखेर मागे, शरद पवारांना सर्वात मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात दोन वर्षांपू्र्वी एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुनावणी घेण्यास योग्य नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली. 

नेमका काय आहे प्रकार?

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. माथाडी कामगारांना ते संबोधित करत होते. माथाडी कामगारांना त्यांनी दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे शरद पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. 

“निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा”– शरद पवार

न्यायालयानं काय म्हटलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका सुनावणी घेण्यास योग्य नसल्याचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. याचिका फेटाळत असल्याचे संकेत देताना याचिकाकर्त्यांनी संबंधित विभागाकडे दाद मागावी, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. अखेर याचिकाकर्त्यांने याचिका मागे घेतली.