मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पवारांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर दिल्लीतील अनेक नेते नाराज आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.
फडणवीस यांच्यावर राज्यातील अनेक नेते नाराज आहेत. मी दिल्लीत अनेक नेत्यांशी भेटलो त्यांच्याशी चर्चा केली. यातून मला एक गोष्ट कळाली की दिल्लीतील अनेक नेतेदेखील फडणवीसांवर नाराज आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.
फडणवीसांनी पाच वर्ष राज्य चालवलं, मात्र या काळात त्यांना आपलं मोठं स्थान निर्माण करता आलं नाही. ते आहेत तिथेच आहेत. मी म्हणेल तोच महाराष्ट्र ही भावना महाराष्ट्राच्या जनतेला पटली नाही, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवारांनी या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती, असं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मनसेच्या एकमेव आमदारांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा – https://t.co/lCCanUYV4U @rajupatilmanase @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
मुख्यमंत्र्यांकडून नितेश राणेंची ‘ती’ मागणी मान्य – https://t.co/vIfLzpwflF @OfficeofUT @NiteshNRane
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
अजित पवार भाजपसोबत का गेले होते?; शरद पवारांचा खुलासा – https://t.co/AjH4W9Okwn @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019