मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं नवीन समीकरण पाहायला मिळत आहे. मात्र हे सर्व जुळवून आणणं सोपं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधी मन कसं वळवलं याबद्दल खुलासा केला आहे.
शिवसेनेनं आणीबाणीला पाठिंबा दिला होता. बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होतं. तसेच प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असताना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. हे सर्व मी सोनियांना सांगितलं. त्यामुळे त्या शेवटी तयार झाल्या, असा खुलासा पवारांनी केला आहे.
काँग्रेसचे आमदार भाजपविरोधात एकत्र येण्यास तयार होते. तसेच त्यांनी शिवसेनेला एकत्र घेण्यास अनुकूलता दाखवली होती. मात्र, प्रश्न सोनिया गांधींचा होता. अखेर त्या शिवसेनेसोबत जाण्यास तयार झाल्या, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे हे वारंवार सांगत होतो कारण ती वस्तुस्थिती होती. तसेच मला शिवसेनेलाही ते सूचित करायचे होते. मात्र, शिवसेनेनं भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याने मला भूमिका बदलावी लागली, असं पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपसोबत येण्याची मोदींनी दिली होती ऑफर; शरद पवारांचं खळबळजनक वक्तव्य – https://t.co/dPbeb8Glye @PawarSpeaks @narendramodi @NCPspeaks @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
“…तर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही” – https://t.co/9bAq4aA8bh @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
“…तर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं ते पाप आहे” – https://t.co/rIWNSM3b23 @Awhadspeaks @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019