मुंबई | तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक पार पडली. जवळपास दीड तासभर ही बैठक चालली.
राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्यात झालेल्या बैठकीविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. केसीआर यांनी आजच्या मुंबईदौऱ्यात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवार यांच्या भेटीनंतर केसीआर यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शरद पवारांना आयुष्यभर विसरू शकत नाही असं सांगतिलं.
शरद पवारांनी तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी मोठा पाठिंबा दिला आहे. 1969 साली वेगळ्या राज्याचा निश्चय झालेला तेव्हापासून ते तेलंगणा राज्य वेगळं होईपर्यंत पाठींबा दिला. त्यामुळे मी त्यांना आयुष्यभर विसरु शकत नाही असं केसीआर यांनी म्हटलं.
देशाचा विकास होत नाहीये,हा देश नीट चालत नाही, आम्ही पवारांचा सल्ला घ्यायला आलोय, असं केसीआर यांनी माधयमांशी बोलताना म्हटलं आहे.
शरद पवार यांना अनुभव जास्त आहे. त्यामुळे मी त्यांचा सल्ला घ्यायला आलोय. देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, असंही यावेळी केसीआर यांनी म्हटलं.
देशाचा विकास आणि अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. देशातील समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असून देशाच्या परिवर्तनात लक्ष घालण्याचं महत्त्वाचं असल्याचंही केसीआर यांनी म्हटलं.
राज्यात सध्या केसीआर आणि ठाकरे यांच्या भेटीची चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विरोधकही सरकारवर निशाणा साधत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Uddhav Thackeray: “सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही”
“उद्धव साहेब, सनम हम तो डूबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना
‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!