मरकज प्रकरणावरून शरद पवार यांची नाव न घेता अमित शहांवर टीका

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरूवातीलाच दिल्लीतल्या मरकज प्रकरणाला गृहमंत्री अमित शहा यांना दोषी धरत त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

दिल्लीत निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला परवानगी पोलिसांनी द्यायलाच नको होती, महाराष्ट्रात तो कार्यक्रम होणार होता. मात्र गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी ती काळजी घेतली, असं म्हणत त्यांनी सरकारचं आणि पोलिसांचं अभिनंदन केलं.

व्हॉट्सअ‌ॅपवर वर येणारे मेसेज काळजी करण्यासारखे, मात्र पाचपैकी चार मेसेज खोटे असतात, लोकांमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे शंकास्पद आहे . दिल्लीतील संमेलनाविषयी वारंवार टीव्हीवर दाखवण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, डॉक्टर, नर्स कष्टाने काळजी घेत आहेत, घरी बसायला पाहिजे, सर्व जात-धर्मानी एकत्र राहण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, येत्या काळात रोजगार कमी होण्याची शक्यता, या संकटाला कसं तोंड द्यावं, यावर जाणकारांनी विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा- शरद पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांना फोन; तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

-“तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाला”

-भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन

-काँग्रेस नेते नसीम खान यांचं तबलिगींबाबत मोठं वक्तव्य!