महाराष्ट्र Top news सातारा

शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना झापलं, म्हणाले…

Shashikant Shinde and Sharad Pawar
Photo Credit- Facebook/ Shashikant Shinde and Sharad Pawar

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यापंचवार्षिक निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला.

ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे.

शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरातील वातावरण तापलेलंशिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. आहे. या दगडफेक प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली.

शिंदे यांच्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत साताऱ्यात झालेल्या राड्यावर भाष्य केलं.

शशिकांत शिंदे यांनी निवडणूक हवी तेवढी गांभीर्यानं घेतली नाही, त्यांनी निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढली नाही असंही पवारांनी म्हटलं आहे. राज्यात पुढे पालिकेच्या, नगरपरिषदांच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना याबाबत जागृत करणं गरजेचं आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

दरम्यान, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, असं शशिकांत शिंदे म्हणालेत.

माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 

एकाच दिवशी राष्ट्रवादीला सलग दुसरा झटका; ‘या’ बड्या नेत्यानेही दिला राजीनामा 

पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; वाचा हवामान खात्याचा इशारा 

“ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती लागली”