शरद पवारांचे भाजपवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | देशात सध्या महाराष्ट्र (Maharashtra) आणि बिहार (Bihar) राज्यांत सत्तांतराचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले तसेच बिहारमधील आघाडी सरकार देखील काल कोसळले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर एकीकडे महाराष्ट्रात भाजप सत्तेत आला आहे, तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमारांनी (Nitish Kumar) युती तोडत भाजपला सत्तेतून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजप नुकतीच चर्चेत आली आहे.

बिहारमधील सत्तांतरावर आणि शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता भाजपवर गंभीर आरोप आणि टीका केली. आपल्या सोबतच्या मित्रपक्षांना भाजप संपवितो, असे पवार म्हणाले.

यावेळी शरद पवारांनी पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) उदाहरण दिले आहे. अकाली दलाला भाजपने संपविल्याचा आरोप पवारांनी केला आहे. त्यांनी शिवसेेनेला संपविण्याचा देखील घाट घातला आहे, असे शरद पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) म्हणाले होते, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते देशात शिल्लक राहणार नाहीत. त्याचा समाचार शरद पवारांनी घेतला.

भाजपच्या अरेरावीला कंटाळून नितीश कुमार यांनी तोडलेली युती रास्त आहे, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, आज नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांनी उपमुुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

महत्वाच्या बातम्या – 

‘… त्याचेच परिणाम शिवसेनेला भोगावे लागतायत’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही झाले, वाचा कोणाकडे कोणतं खातं?

शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…

संघपरिवारातील संघटनेकडून शिंदे सरकारला विरोध?; महत्त्वाची माहिती समोर

गंभीर आरोप असलेल्या ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ