चंद्रकांत पाटलांच्या टीकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांना आम्ही…”

सातारा | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यांनी महाराष्ट्रात गोंधळ निर्माण केला आहे. राज्यात राष्ट्रापती राजवट लागू होणार, असं खळबळजनक वक्तव्य पाटील यांनी केलं होतं.

महाविकास आघाडीवर टीका करताना पाटील यांनी सातत्यानं सरकार जाण्याबाबत आपली सक्रिय भूमिका मांडली आहे. अशात सध्या राज्य विधीमंडळाचं अधिवेशन चालू असताना हा नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरून आता राज्यात राजकीय युद्ध पेटलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यपालांच्या सहभागावरून राजकारण पेटलं आहे.

राज्यपालांनी सरकारला दोनवेळा अध्यक्षपदासाठी वेळ देऊनही सरकारनं निवडणूक घेतली नाही. हा राज्यपाल आणि घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकारनं राज्यपालांचा केलेला अपमान या एकाच मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं खळबळजनक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असं म्हटलं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पाटील यांनी याअगोदरसुद्धा अशी वक्तव्य केली आहेत. महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्यांचं ऐकलं पण काही परिणाम झाला नाही. परिणामी आम्ही त्यांना गांभिर्यानं घेत नाहीत, असा खोचक टोला पवार यांनी लगावला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपलं काम करत आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे, असं पवार यांनी पाटील यांना उद्देशून म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या अगोदरही राज्य सरकार दोन दिवसात पडणार आहे, असं वक्तव्य केलं होतं. परिणामी पाटील यांना अशी वक्तव्य करायची सवय आहे, अशी टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर” 

‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते”