मुंबई | 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर राज्यसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. पण, अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकालावर बोलताना शरद पवार यांनी चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही, असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत ती अपक्षांची आहेत, शरद असं पवार म्हणाले.
तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचा उमेदवारांचा जो कोटा दिला, त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडलं आहे आणि ते मत कुठून आलंय हे मला ठाऊक आहे. ते या आघाडीचं नाही ते दुसऱ्या बाजूचं आहे, असंही पवारांनी सांगितलं.
चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे हा फरक पडला. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे. त्यात वेगळं काही नाही, असं पवारांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”
Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट