शरद पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; सत्तेत आलो तर…!

अहमदनगर : भाजप-शिवसेना सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी अवघ्या 36 टक्के लोकांना मिळाल्याचा दावा  काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे. तसेच आघाडीची सत्ता आल्यास राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना शरद पवारांनी ही घोषणा केली आहे. शरद पवारांनी यावेळी बोलताना भाजप-शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरायला लावल्यानं शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. शेतकऱ्यांविषयी आस्था नसल्याचेच हे द्योतक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नगर हा स्वातंत्र्य चळवळीचा जिल्हा आहे. त्यामुळं या जिल्ह्यातून प्रतिगामी, जातीयवादी, माणसामाणसांमध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्या आणि काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप आणि इतर शक्तींना चले जाव करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

दरम्यान, 12 चे शून्य करायचे तेव्हा करा, पण सत्तेचा दर्प आणि गुर्मी येऊ देऊ नका. आधी स्वत:च्या कारखान्याचं पाहा. कर्ज फेडा, अशी टीका दिलीप वळसे-पाटील राधाकृष्ण विखेंवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-