“बीडमध्ये माझी ‘ती’ चूकच झाली”

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान बीडमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवारांनी बीडमधील पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. मात्र आज उमेदवार जाहीर करणं माझी चूकच झाली, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. खरं तर प्रदेशाध्यक्षाने उमेदवार जाहीर करायला हवे होते. पण लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. शरद पवारांनी आज नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद सांधला. तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

जे देशात घडतंय ते योग्य नाही, सीबीआय, ईडी या सरकारी यंत्रणा गुन्हेगारांसाठी होत्या. मात्र सत्तेचा गैरवापर करत पक्षांतर घडवला जातोय, असा घणाघात पवारांनी केला आहे.

गेली पाच वर्ष देशात कुणाचं राज्य होतं. उदयनराजेंची काम कुणी रोखली?, असा सवाल करत विरोधात राहुन देखील लोकांची कामं करता येतात, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसलेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, काही लोक सत्तेशिवाय राहु शकत नाहीत, तर काही लोक लोकांना भिती दाखवत पक्षांतर करायलं भाग पाडत आहेत, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-