“कोरेगाव-भीमाच्या वातावरण निर्मिती करण्याला संभाजी भिडेच कारणीभूत”

मुंबई| कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक जमायचे. स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांमध्ये कधी कटुता नव्हती. पण संभाजी भिडे यांनी कोरागाव-भीमा मध्ये वेगळं वातावरण निर्माण केलं असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांंनी केला आहे. ते मंगळवारी कोरेगाव-भीमा व एल्गार परिषदे संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

कोरेगाव-भीमाच्या लढाईत काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला हे वास्तव आहे.  एल्गार परिषदेत 100 पेक्षा जास्त संघटना सहभागी होत्या. कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद संपूर्णपणे वेगळ्या घटना आहेत असं यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्पष्ट केलं.

परिषदेला हजर नसलेल्या लोकांवरही पोलिसांनी खटले भरले आहेत. ज्या नामदेव ढसाळांच्या गोलपिठा कविता संग्रहाला महाराष्ट्र सरकारनं पुरस्कार देऊन गौरवलं. केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्री दिला. त्यांची कविता वाचली म्हणून पोलिसांनी खटला भरला. पुणे पोलिसांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या गैरवापराची आणि सत्य बाहेर यायला हवं,” अशी भूमिका शरद पवारांनी यावेळी मांडली.

त्यांची कविता वाचली म्हणून पोलिसांनी ढवळेंवर खटला भरला. या काव्यात एक संतापजनक ओळ आहे. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितांमध्येही हा संताप आहे. साहित्य आणि काव्य आक्रमक असलं म्हणून त्यांना देशद्रोही म्हणणार का?” असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-8 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी नमतं घेतलं….!

-तुकाराम महाराजांचे वंशज म्हणतात, ‘इंदोरीकरांमुळे कीर्तनाचा दर्जा घसरतोय!’

-“तृप्ती देसाई, तुम्ही नगरमध्ये पाय ठेवून दाखवाच”