मुंबई | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवणार असल्याचं दिसत आहे. भाजपने मिळवलेल्या या विजयानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया (Maharashtra) येत आहेत.
उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्रात देखील त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. महाजनांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र अभी बाकी म्हणणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है!, अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचं सांगितलं आहे.
1977 मध्ये सर्वच राज्यात काँग्रेस आली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात असा सगळ्याच राज्यांत काँग्रेस हरली होती. त्यावेळी काँग्रेस संपली असं म्हटलं गेलं. मात्र काँग्रेस पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.
राजकीय पक्ष हे एका क्षणात संपत नसतात. पण काँग्रेसच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी आपण कुठे कमी पडलो, कुठे एकत्र येण्याची गरज होती आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे होते, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसला दिला आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि केंद्र सरकारविषयी असलेल्या रागामुळे जनतेने आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला. तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांची चूक झाली असं वाटत नाही. अखिलेश यादव यांना मिळालेल्या जागा दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंजाबमधील पराभवानंतर शरद पवारांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला, म्हणाले…
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं!
काँग्रेसलाजमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं!
भाजपचा राऊतांना चिमटा, म्हणाले “संजय राऊत हाउज द जोश!”
‘म्याऊ म्याऊ’ म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं; ट्विट करत म्हणाले…