“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी विधानसभेत केलेल्या खळबळजनक आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही. या सरकारडे स्वच्छ बहुमत आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून सत्ता कशी मिळवली जाईल याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नाला तिन्ही पक्ष पाठिंबा देणार नाही. या पक्षांकडून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रातील जी भूमिका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सर्वांचाच ईडीचा विरोध आहे. राऊतांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत आहे, असंही पवारांनी सांगितलं.

नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचा ठपका भाजपतर्फे ठेवण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीद्वारे नवाब मलिक यांना कोठडी सुनावण्यात आली असून त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणीही तीव्र होत आहे. यावरही पवारांनी भाष्य केलं.

मलिकांचा कशासाठी राजीनामा घ्यायचा? जो माणूस 25- 30 वर्ष विधीमंडळात आहे. या वर्षात कधी आरोप केला नाही. आता करत आहे. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर तो दाऊदशी संबंधित ठरवला जातो हे चुकीचं आहे. आम्ही मलिकांच्या पाठिशी आहोत, असं शरद पवार म्हणालेत.

भाजपच्या (Bjp) एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnavis) सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं, असं शरद पवार म्हणालेत.

ही रेकॉर्डिंग खरी आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता, असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर 

गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य