“नारायण राणेंनाही अटक झाली होती, तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला का?”

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही, असा टोला पवारांनी भाजपला लगावलं आहे.

उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील, असा टोला लगावतानाच एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी भाजपवर केली.

मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली 20 वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते, असं पवार म्हणाले.

यावेळी बोलताना पवारांनी रशिया युक्रेन युद्धावर देखील भाष्य केलंय.युक्रेनमध्ये अजूनही अनेक विद्यार्थी अडकले असून त्यांच्याशी माझं बोलणं सुरु आहे. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत, त्या जाणून घेऊन मार्ग काढणं आवश्यक आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

या संकटात कुणी काय केलं काय नाही याची चर्चा करण्याची वेळ नाही. या मुलांना कसं वाचवलं पाहिजे यावर लक्ष देण्याची गरज आहे, सत्ताधाऱ्यांकडून अधिक आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

रशिया युक्रेनच्या युद्धात स्थानिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. माझं केंद्र सरकारशी बोलणं झालं. तेथे अडकलेल्या भारतीयांना इथे आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जे जे करत आहे ते करत आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे, असंही ते म्हणाले.

देशाच्या दुतावासाने त्यांना सांगितलं युक्रेनच्या सीमेच्याबाहेर येता येईल असा निर्णय घ्या. पाच ते सहा तास चालावं लागेल इतक्या अंतरावर सीमा आहे. जायला आमची तयारी आहे. भयंकर थंडी आहे. गोळीबार सुरू आहे. आम्ही कसं जाणार असं विद्यार्थी म्हणत आहे. त्यामुळे ते अडकले आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले… 

“राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करतात” 

नितेश राणेंच्या नव्या ट्विटने चर्चांना उधाण, म्हणाले… 

मोठी बातमी! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबाबत रशियन मीडियाचा खळबळजनक दावा! 

फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर, रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या