मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. सरकारने त्याबाबतची घोषणा करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मलिक गेल्या 25-30 वर्षापासून सभागृहात आहेत. एवढ्या वर्षात कधी मलिकांवर असे आरोप झाले नाहीत. आताच का आरोप होत आहेत?, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
नवाब मलिकांचा कशासाठी राजीनामा घ्यायचा? जो माणूस 25-30 वर्ष विधीमंडळात आहे. या वर्षात कधी त्यांच्यावर आरोप केला नाही. आता करत आहेत. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर तो दाऊदशी संबंधित ठरवला जातो हे चुकीचं आहे. आम्ही मलिकांच्या पाठिशी आहोत, असं शरद पवार म्हणाले.
या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही. या सरकारडे स्वच्छ बहुमत आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून सत्ता कशी मिळवली जाईल याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नाला तिन्ही पक्ष पाठिंबा देणार नाही. या पक्षांकडून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातील जी भूमिका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सर्वांचाच ईडीचा विरोध आहे. राऊतांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत आहे, असंही पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही”
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी!
“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”
पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर