आबा तुम्ही माझं ऐकलं असतं तर…- शरद पवार

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

आबा तुम्ही माझ्यापेक्षा वयानं फार लहान होता. माझ्यासारख्या माणसाच्या अगोदर आबा का गेले? असा भावनिक प्रश्नही शरद पवार यांनी यावेळी विचारला.

दरम्यान, शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याविषयी काही आठवणींना देखील उजाळा दिला आहे.