पुणे महाराष्ट्र

उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जावली-साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 

शनिवारी रात्री शिवेंद्रराजे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमध्ये पवारांनी उदयराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका, अशा शब्दात शरद पवारांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

शिवेंद्रराजे आणि शरद पवारांच्या बैठकीत शिवेंद्रराजेंनी आजवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. बैठकीनंतरही शिवेंद्रराजे राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे. 

खासदार उदयनराजेंशी कितीही प्रामाणिक राहिलो तरीही ते आपल्याविरोधात कुरघोड्या करतच आहेत. ते पक्षाविरोधात नेहमी बोलत असतात. आम्ही मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहूनही आमच्यावर अन्याय. उदयनराजेंवर पक्ष कोणतीच कारवाई करत नाही, असं सांगत शिवेंद्रराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उदयनराजेंचं मी बघतो, पक्षाला तुमची गरज आहे. तुम्ही पक्ष सोडू नका, असं म्हणत शरद पवारांनी शिवेंद्रराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला सचिन अहिरांनी पक्ष सोडून मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेतेमंडळी पक्षाला रामराम ठोकून पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

-काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

-महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही- चंद्रकांत पाटील

-‘बाजी पलटने में देर नही लगती…’; धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल

IMPIMP