हिंगोली : ज्यांना पक्षानं मोठं केलं तेच नेते पक्ष सोडून गेले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जनताच धडा शिकवेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार हे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान हिंगोली येथे बोलताना पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
गेल्या पंधरा वर्षात पक्षाने ज्यांना मोठं केलं ते पक्ष सोडून गेले. विकासकामांचं कारण सांगून पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांनी मंत्री असताना काय काम केलं?, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.
फोडाफोडीचं राजकारण आपल्यासाठी नवीन नाही. मात्र माझा मतदार त्यांचा डाव हानून पाडल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी नवीन नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी महाराष्ट्राचा दौरा करत आहे, असं पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. शेतीमालाला योग्य भाव नाही. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. या सरकारच्या काळात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्योजकांचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. सरकारने एकीकडे रोजगारी वाढवण्याचं आश्वासन देत बेरोजगारी वाढवली आहे, असा आरोपही शरद पवारांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोदींच्या भाषणाची सुरूवात मराठीतून तर मुख्यमंत्र्यांचं मात्र हिंदीत- https://t.co/K8RC0UxV4y #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
…तर मनमोहन सिंगांनी पाकिस्तानवर हल्ला केला असता; ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा गौप्यस्फोट- https://t.co/XDxsyVeetZ #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
“कोकणात शिवसेना मी आणली, त्यामुळे पुढचे दोन्ही खासदार हे भाजपचेच असतील”- https://t.co/pJSNqDlCjZ #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019