महाराष्ट्र मुंबई

…तर मी अमित शहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं- शरद पवार

मुंबई : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर आले होते.

काल रात्री माझी जीभ आणि गळ्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका, असं सांगितलं आहे. मात्र सध्याचे पक्षांतराचं राजकारण पाहता मी जर कार्यक्रमाला आलो नसतो तर मी गिरीश महाजनांसोबत अमित शहांना भेटायला गेलो असं छापून आलं असतं, असं म्हणत शरद पवारांनी पक्षांतराबाबत चिमटा काढला आहे.

मला थोडा त्रास झाला पण अशा चर्चा व्हायला नको म्हणून मी कार्यक्रमाला आलो, असं बोलताच सभागृहात हशा पिकला.

पहिल्यांदा सभागृहात गेल्यावर पायावर पाय ठेऊन बसायचं नसतं असा सभागृहाचा नियम आहे. पण मी चुकून दोन वेळा पायावर पाय ठेवला आणि मला मार्शलने पकडून बाहेर काढलं. त्यावेळी मी त्याला आत्ता सभागृहातून जातोय नंतर येईल तो कायमसाठी असं म्हणालो, अशी एक आठवण शरद पवारांनी सांगितली आहे.

तुम्ही मला सांभाळून घेतलं म्हणून मी हे पुस्तक लिहू शकलो, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो त्याच्याही बातम्या टीव्ही-पेपरला आल्या. ‘विधानसभा’ गाजली. गेली पाच वर्षे निवांत वेळ होता म्हणून पुस्तक लिहू शकलो पुढे असा वेळ मिळू नये, असं पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सुनिल तटकरे गेले चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर अन् नव्या राजकीय चर्चांना उधाण

-शरद पवार शेजारी बसलेले… अन् मुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणावर म्हणतात…

-पवार साहेब… ‘या’ नेत्याने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय- जितेंद्र आव्हाड

-शोलेचा डायलॉग बदलून आता म्हणावं लागतंय ‘जो डर गया वो भाजप में गया’!

-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या गडानंतर सोलापूरचा बुरूज ढासळणार??

IMPIMP