… तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल- शरद पवार

कोल्हापूर | एसटी कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत. यातील उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शब्दाबाहेर नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तुम्ही एसटी कामगारांच्या प्रश्नावर बैठक बोलवा. त्या बैठकीला मलाही बोलवा. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल, असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यव्यापी अधिवेशनात शरद पवारांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राऊतांकडून जबाबदारी काढून परबांकडे दिली. त्यामुळे अधिवेशनात उत्साह दिसत असल्याचं म्हणत पवारांनी 4 वर्ष एसटी कामगारांच्या अधिवेशनाला उपस्थित न राहणाऱ्या दिवाकर रावते यांना टोला लगावला.

 

महत्वाच्या बातम्या-

-औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद!

-भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आणि नेत्यांमध्ये घुसमट- शरद पवार

-काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरातांना हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?

-आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही- अमित शहा

-दिल्ली निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली; अमित शहांची कबुली