साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो, हे मराठवाड्याच्या मातीनं दाखवून दिलं- शरद पवार

उस्मानाबाद |93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरूवात झाली आहे. साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने झाला. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींसह लहान मुलं आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो. हे मराठवाड्याच्या मातीने दाखवून दिले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड याच परंपरेला धरून आहे. मला ह्या निवडीने सार्थ समाधान वाटलं असल्याचं शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी कष्ट घेणाऱ्या संयोजकांना, साहित्यिक मंडळींना, साहित्य रसिकांना मी संमेलन यशस्वीतेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो!, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ब्राम्हण महासंघ पुण्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मला पत्र पाठवून सविस्तरपणे आपली मतं मांडली आहेत. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड आम्हाला मान्य नाही. तसेच त्यांचे लेखन आणि विचारसरणी आम्हाला मान्य नाही , असं पत्रात लिहिलं असल्याचं महानोर यांनी सांगितलं आहे.

 

 

 

हत्वाच्या बातम्या-